भारतीय लेखिका : ४० पुस्तकांच्या अनुवाद प्रकल्पाचा अनुभव
भारतीय स्त्री लेखकांची ही निवड त्या भाषेतील प्रातिनिधिक आहे, असं नाही. मात्र या स्त्री लेखकांनी आपल्या भाषेतील साहित्यात आणि पर्यायानं भारतीय साहित्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, हे निश्चित. वय, वर्ग, लोकप्रियता, पुरस्कार असे मुद्दे विचारात न घेता स्त्री-विषयक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या, स्त्री-जीवनाचं समकालीन दर्शन घडवणाऱ्या, एकुणात स्त्री-केंद्रित असणाऱ्या साहित्याचा विचार इथं केला.......